राधानगरी : तालुक्यातील धामोड येथील धन्वंतरी आयुर्वेदिक दवाखान्याचे डॉक्टर विश्वास बिडकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शोभा बिडकर यांनी यावर्षी प्रथमच शेणापासून गणेशमूर्ती बनवलेल्या आहेत . या मूर्तींना मोठी मागणी होत आहे. हा गणपती बनवताना केवळ शेण, गोमूत्र व कापूर याचाच वापर करण्यात आला आहे. शेणाच्या गणपतीमुळे पर्यावरणालाही फायदा होणार आहे. हे गणपती केवळ गायीचे शेण, गोमूत्र व कापराचा वापर करून तयार केले आहेत. या दाम्पत्याने पर्यावरण पुरक गणेशमुर्ती बनवल्या आहेत. देशी गायीच्या शेणाचा वापर करून त्यांनी या मुर्ती तयार केल्या. या मुर्तीसाठी वापरलेले रंगही नैसर्गिक आहेत. धामोड सारख्या ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. विश्वास बीडकर व डॉ. शोभा बीडकर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




