Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialलालबागच्या राजाला अनंत अंबानींकडून सोन्याचा मुकूट ; इतकी.. आहे किंमत

लालबागच्या राजाला अनंत अंबानींकडून सोन्याचा मुकूट ; इतकी.. आहे किंमत

मुंबई: गणेश उत्सव म्हटलं की मुंबईत सर्वाधिक चर्चा असते ती लालबागचा राजा गणपतीची. मूर्ती, त्या मूर्ती भोवतीची आरास, सुंदर देखावा हे सगळं काही मन मोहून टाकणारं असतं. या मंडळाचं हे ९१ वं वर्ष आहे. यावेळी लालबागच्या राजाला अनंत अंबानींनी सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. लालबागचा राजा गणपतीची पहिली झलक गुरुवारी पाहण्यास मिळाली. त्यावेळी ही माहिती समोर आली.

मयूरासनावर विराजमान लालबागचा राजा
यंदा लालबागचा राजा मयूरासनावर विराजमान आहे. यंदाच्या लालबागच्या राजाचा मुकूट हा सोन्याचा आहे. देशातील गर्भश्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. अनंत-राधिका यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे हा मुकूट अर्पण केला आहे अशी चर्चा आहे.

यंदा लालबागच्या राजाला मरून रंगाचं वेल्वेटचं सोवळं नेसवण्यात आलं आहे. तर, काशी विश्वनाथ मंदिराच्या थीमचा देखावा साकारण्यात आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात विश्वस्तपदी नियुक्ती झालेल्या अनंत अंबानी यांनी राजाला सोन्याचा मुकूट भेट दिला आहे. या मुकुटाचं वजन २० किलो एवढं आहे. तर, किंमत १५ कोटी रुपये आहे. हा मुकूट बनवण्याकरता कारागीरांना दोन महिने लागले होते, अशी माहिती लालबागच्या राजाचे मानव सचिव सुधीर साळवी यांनी दिली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News