मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने भाडेतत्त्वावरील नवीन १३१० खासगी बसगाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आणि पुणे विभागासाठी ४५०, छत्रपती संभाजी नगर आणि नाशिक विभागासाठी ४३०, तर अमरावती व नागपूर विभागासाठी ४६० नवीन बसगाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.




