Sunday, December 7, 2025
Google search engine
Homecrimeधक्कादायक..युट्युबवर व्हिडिओ बघून केली शस्त्रक्रिया,15 वर्षीय मुलाचा मृत्यू

धक्कादायक..युट्युबवर व्हिडिओ बघून केली शस्त्रक्रिया,15 वर्षीय मुलाचा मृत्यू

पिटीआय : बिहारच्या सारण जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तेथील एका डॉक्टरांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून रुग्णाची शस्त्रक्रिया केल्याचा  प्रकार घडला आहे. या घटनेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भातील वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने दिलं आहे.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील भुवलपूर गावातील चंदन साह यांनी आपल्या १५ वर्षीय मुलाला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे गरखा मोतीराजपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यानंतर १५ वर्षीय मुलाच्या पित्त मूत्राशयाची शस्त्रक्रिया करावी लागेल असं संबंधित डॉक्टरने सांगितल्याचं चंदन साह यांनी म्हटलं आहे. त्यानंतर चंदन साह यांनी मान्य केलं आणि त्यांच्या मुलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल केलं. त्यानंतर संबंधित डॉक्टरने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबांनी केला आहे.

शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलाची प्रकृती बिघडल्याचं पाहून डॉक्टरही घाबरले. त्यानंतर मुलाला पाटणा येथील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. त्यासाठी डॉक्टरने रुग्णवाहिकेची व्यवस्थाही केली. मात्र, तोपर्यंत शस्त्रक्रिया केलेल्या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार मधौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडला.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News