बालिंगा(मोहन कांबळे): बालिंगा ता. करवीर येथील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री महादेव मंदिराला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असे उद्गार महादेव मंडळाचे अध्यक्ष अजय गोविंद भवड यांनी केले.
सतेज पाटील व दोनवडे सरपंच बबन शिंदे यांच्या सहकार्याने गेली चार वर्षे सातत्याने जिल्हा परिषद कोल्हापूर ते मुंबई असा पाठपुरावा करून या मंदिराला विकास साधता हा आनंदाचा क्षण माझ्यासाठी व महादेव भक्तांसाठी कायम स्मरणात राहील असे गौरवउदगार काढले.या मंदिराची नित्य पूजा महादेव मंदिराचे पुजारी बाळासाहेब अतिग्रे करतात या यशात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावातील जेष्ठ मंडळी, तसेच एम. एस. भवड,श्रीकांत भवड,रविंद्र भवड,,मधुकर जांभळे, अनिल पोवार, अमर जत्राटे,जनार्दन जांभळे.या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महादेव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे साद्य झाल्याचे अध्यक्ष अजय भवड यांनी यावेळी सांगितले.