कागल : कणेरी येथील श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठासह कागल तालुक्यातील विविध तीर्थस्थळांच्या विकासासाठी तब्बल ३५ कोटी निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या “ब” वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेंतर्गत तालुक्यातील नऊ तीर्थस्थळांच्या विकास आणि परिसर सुधारण्यासाठी हा निधी मंजूर झाला.
यामध्ये कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली, पिराचीवाडी, निढोरी, कसबा सांगाव, लिंगनूर- कापशी, पिंपळगाव बुद्रुक, चिमगाव, बोरवडे येथील मंदिरांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या “ब” वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मंदिरांची गावनिहाय यादी अशी, श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी- तीन कोटी, श्री सिद्धेश्वर देवालय सिद्धनेर्ली- दोन कोटी, श्री. गहिनीनाथ देवालय, पिराचीवाडी -सव्वा दोन कोटी, श्री. भावेश्वरी देवालय, लिंगनूर- कापशी – तीन कोटी, श्री. महादेव मंदिर, निढोरी- तीन कोटी, जंगलीसाहेब गैबी पीर दर्गा, कसबा सांगाव -चार कोटी, श्री केदारलिंग- खंबलिंग देवालय, पिंपळगाव बुद्रुक- तीन कोटी, श्री चिमकाई देवी मंदिर, चिमगांव – एक कोटी, श्री. केदारलिंग ज्योतिर्लिंग देवालय, बोरवडे -अडीच कोटी. तसेच; करवीर तालुक्यातील श्री महादेव देवालय, शिंगणापूर – दीड कोटी, श्री. महादेव देवालय, बालिंगे- पाच कोटी, श्री. पार्वती देवालय, वडणगे -अडीच कोटी असा निधी मंजूर झाला आहे