पन्हाळा प्रतिनिधी , (शहाबाज मुजावर): युनेस्को जागतीक वारसा नामांकन अंतर्गत पन्हाळा किल्ल्यावर स्मारक होत आहे. त्याकरिता ऑक्टोंबर महिन्यात पन्हाळावर युनेस्को ची टीम पाहणी करण्यासाठी येणार आहे. सल्लागार समिती, जागतिक वारसा स्थळ नामांकन यांच्या निदेॅशानुसार पन्हाळा नगरपरिषदेने सर्वच व्यवसायिकांना प्रतिबंध करणाऱ्या नोटिसा दिनांक 6 सप्टेंबर रोजी दिल्या आहेत.
याबाबत सर्व व्यावसायिकानीं प्रांताधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात २०० ते २५० कुटूंबे हे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत,त्यांना उत्पन्नाचे कोणतीही साधन नाही. आहे त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दयावी तसेच त्यांचे उदहारनिर्वाहाचे साधन काढून घेऊ नये. अटी-शर्ती, स्वच्छता इत्यादी सह जुन्या व्यवसायिकांनाच प्राधान्य द्या व त्या ठिकाणी दुकान लावण्यास मान्यता असावी. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय पाटील, रवींद्र धडेल, असिफ मोकाशी , माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, नगरसेवक रवींद्र तोरसे, राजू नगारजी, संग्रामसिंह भोसले, सुभाष गवळी, जितेंद्र पवार, साहिल पवार, राहुल भोसले, शहानवाज मुजावर,आदी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.