बालिंगा(मोहन कांबळे ) :बालिंगा ता. करवीर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पौर्णिमा युवराज जत्राटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच पंकज कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यमान सरपंच सौ.सुध्दा रंगराव वाडकर यांनी काम पाहिले. या पदा करीता सौ. पौर्णिमा जत्राटे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी ग्रामसेवक कारंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल पोवार, मधुकर जांभळे, श्रीकांत भवड, युवराज जत्राटे,पंकज कांबळे, मयुर जांभळे, सौ. पुजा जाभळे, नंदकुमार जांभळे, संतोष जाधव व ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.