दिंडनेर्ली प्रतिनिधी (सागर शिंदे): इस्पूर्ली (ता.करवीर)येथील दशरथ गुरव युवा मंच यांचे वतीने झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अहिल्यादेवी होळकर ग्रुप अब्दुल लाट यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक राधाई महिला बचत गट बेलवळे खुर्द, तृतीय धनलक्ष्मी महिला बचत गट पंडेवाडी, चतुर्थ नागनाथ बचत गट ग्रुप सोनाळी यांनी मिळविला.
एकूण १३ महिला ग्रुप स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील,सरपंच लखन बाबर,उपसरपंच संजय कांबळे,राजाराम पाटील, प्रदीप शेटे, शुभांगी पोर्लेकर,जयश्री चिंदगे,मनीषा कांबळे, राजाराम चौगले, राजाराम राजीगरे,युवराज चौगले,तानाजी पाटील सरदार कोरे,सागर कांबळे,आदिनाथ चौगले,धनाजी जामदार,कृष्णात तांबेकर,संदीप चौगले,माणिक चौगले, उदय पोर्लेकर आदी सह महिला,गावातली सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.