कोथळी करवीर /तानाजी पोवार: कोथळी ता करवीर येथील एक गाव एक गणपती उपक्रमाला या वर्षीपंचवीस वर्ष पूर्ण झाली असून यंदाही हा गणेशत्सव पारंपारीक वाद्याच्या गजरात मोठ्या उत्साहात रौप्य महोत्सव गणेश उत्सव साजरा होत आहे.
महाराष्टात सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करताना अनेकदा वाद विवाद होतात व आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते म्हणून गावातील मंडळानी वेगवेगळे गणपती नबसवता सर्वानी एकत्र य़ेऊन ” एक गाव एक गणपती ” ची स्थापना करून गावात विविध सामाजीक उपक्रम राबवता येतात व विकास करता येतो ही संकल्पना महाराष्टात सर्व प्रथम 1997 साली कोल्हपूर जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख माधवराव सानप यांनी राबवली वजिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना सर्व गावातील मंडळाना ही संकल्पना समजावून सांगून प्रबोधन करण्याचे आदेश दिले होते.
त्या वर्षी कोथळी ता करवीर येथे करवीर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जयवंतराव देशमुख या ंनी येथे गणेशउत्सव साजरा करणारी मराठा मंडळ,मसुदी चौक,जय शिवराय मंडळ,शिवतेज मंडळ,हनुमान तालीम मंडळ,तरून विकास तालीम मंडळ वजय भिम तरून मंडऴ यांना बोलावून ही गाव एक गणपती ची संकल्पना समजावून सांगितली होती व या संकल्पनेची दखल घेऊन तात्कालीन सरपंच कै विठ्ठल गणपती पाटील यांनी 15 आँगस्ट 1997च्या ग्राम सभेत एक गाव एक गणपती साजरा करण्याचे आवाहान केले. सर्व प्रथम याला विरोध झाला पण गावातील जेष्ठ नेते भोगावती कारखाण्याचे संचालक केरबा भाऊ पाटील व गोकुऴ दुध संघाचे माजी संचालक कै संपतराव आमते यांनी सर्व तरून मंडऴांना एक गाव एक गणपतीचे महत्व पटवून दिले वसर्व मंडऴानी निर्णय घेऊन गावातील हनुमानतालीम व तरून विकास तालीमी मध्ये एकत्रीत गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरले तेव्हा पासून (1997)ते आजपर्यत गावात एक गाव एक गणपती मोठ्या उत्सवात साजरा केला जातो यावर्षी या गणेश उत्सवाला पंचवीस वर्षे पूर्ण झाले असून रौप्य महोत्सव एक गाव एक गणपती गणेश उत्सव साजरा होत आहे या मध्ये विविध सामाजीक उपक्रम ,महीलांसाठी स्पर्धचे आयोन, करमणूक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. विसर्जनावेळी पारंपारिक वाद्याच्या गजरात या गणपतीचे विसर्जन काहीली मध्ये केले जाते
प्रतिक्रिया कोट 1997 साली शासनाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आव्हानाला कोथळी तालुका करवीर येथील ग्रामस्थ तरुण मंडळांनी गावातील वडीलधाऱ्यांचे सूचनेचे पालन करत एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवून गावातील एकोपा एकजुटी व गट तट न मानता सर्व सामाजिक क्षेत्रातील लोक एकाच व्यासपीठावर येतात आणि हा गणेशोत्सव साजरा करतात या उपक्रमाला या वर्षी 25 वर्षे पूर्ण झाले असून रौप्य महोत्सव साजरा होत आहे हा एक आदर्श असून या आदर्शाचे इतर गावातील तरुण मंडळांनी आदर्श घ्यावा व गावाचा एकोपा अशा उपक्रमातून दाखवावी.