पन्हाळा प्रतिनिधी (शहाबाज मुजावर):महाराष्ट्रातील आकरा किल्ले व तामिळनाडूतील जिंजी हा किल्ला जागतिक वारसात जाणार आहेत.त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे .करवीर ची राजधानी असणारा पन्हाळा हे देखीलत्यामध्ये समाविष्ट आहे. त्याबाबत आज पन्हाळा येथिल सांस्कृतिक हॉल या ठिकाणी सर्व पन्हाळा वासियांशी जिल्हाधिऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक, रामानंद गोसावी, यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, जेस्मेल राजस्थान येथील किल्ल्यातील लोकांना व्यवसायिकांना हलवले आहे.तसा इथे प्रश्न उपस्थित होणार आहे का ? तसेच शासनाने नाइकीनीचा सज्जा, रेडेमहाल,इत्यादी इमारती दुरुस्ती कराव्या, या इमारतींवर लक्ष द्यावे यावर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी त्यापद्धतीचा प्रकार इथे होणार नाही असे सांगितले. तसेच सर्व पन्हाळा वासियांना विश्वासात घेऊनच निर्णय होतीलअसेही म्हणाले.
माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडे यांनी जो जुना नाका काढणार आहे तो काढून नये त्या ठिकाणी काहीतरी पर्यटकांसाठी माहिती केंद्र किंवा वस्तुसंग्रहालय अशा पैकी काहीतरी होते का पहावे ? कारण भविष्यात त्या ठिकाणी कोणतीही इमारत बांधण्यास परवानगी मिळणार नाही अशा सूचना केल्या.
माजी उपनगराध्यक्ष, चेतन भोसले यांनी पन्हाळा वासियांच्या पर्यटकांच्या सोयीसाठी पन्हाळा गडाची तटबंदी मोकळी करावी. पर्यटननांसाठी जे खाजगी बंगलेवाले आहेत. त्यांच्या मालकीचे बुरुज झाले आहेत.मोकळे करून घ्यावे. अशी सूचना केली जिल्हाधिकारी यानी योग्य निधी उपलब्ध झाल्यास आम्ही तटबंदी मोकळी करू असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
माजी नगराध्यक्ष विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू आगा यांनी पर्यायी रस्त्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मध्यंतरी भूसंकलन होऊन पन्हाळगड या ठिकाणी रस्ताच नव्हता जर युनोस्को मध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीची परिस्थिती झाल्यावर त्यासाठी पर्यायी रस्ता असावा असे सुचवले. माजी नगरसेवक अख्तर मुल्ला यांनी, ज्या पद्धतीने प्रशासन चार दरवाजा ऐतिहासिक इमारती जवळ असणारे पन्हाळचा जुना नाका काढला जात आहे. तेथील झाड काढले जात आहे तशाच पद्धतीने वैयक्तिक असणाऱ्या युनेस्को चा हातोडा पडणार काय ? तसेच तडबंदी च्या शंभर मीटरच्या आतल्या जे जुने बांधकाम आहेत.त्यांच्या परवानगी चे कसे होणार असे प्रश्न उपस्थित केले. यावर भारतीय पुरातत्व खात्याचे अधिकारी यांनी सांगितले की, जे काय आहे ते दुरुस्तीची पूर्वीप्रमाणे परवानगी त्यांना दिले जातील. युनोस्को येणार म्हणजे काय नविन कायदा नाही एक संस्था आहे.जे जुने नियम भारतीय पुरातत्त्व खात्याचे आहेत तेच राहतील असे त्यानीं सांगितले.
राजू सोरटे राष्ट्रीय बहुजन संस्थापक अध्यक्ष यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, भारतीय पुरातत्व विभागाची सर्वच कायदे युनोस्को साठी लागू होणार का ? असे प्रश्न जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना विचारण्यात आले. बैठक होण्यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांनी जेष्ठ गाईड हानिफ नगारजी यांच्याकडून पन्हाळा किल्ल्याची माहिती पन्हाळा किल्ला पाहून घेतला होता.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे,भारतीय पुरातत्व सहाय्यक संरक्षक, विजय चव्हाण, तहसीलदार,माधवी शिंदे ,मा. मुख्याधिकारी चेतनकुमार माळवी, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते ,सार्वजनिक बांधकाम विभाग अमोल कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संजय बोंबले इ.अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवक, जीवन पाटील , पत्रकार राजू दळवी, रामचंद्र काशीद,आनंद जगताप , महिला व्यवसायिक ,शकुंतला मुडेकर, सुलभा पवार,रिजवाना मुत्तवल्ली, शंकर भोंगळेपाटील, राजू नगारजी, संग्रामसिंह भोसले, साहिल पवार,राहुल भोसले, शहानवाज मुजावर,तनवीर काजी आदी नागरिक उपस्थित होते.