राधानगरी विधानसभा मतदार संघात नवनिर्मितीचा ध्यास घेऊन आपण काम करीत असून आपला मतदारसंघ आरोग्य, शैक्षणिक, वीज, नळपाणी योजना, छोटी मोठी धरणे, रस्ते व पर्यटन विकासाच्या बाबतीत राज्यात एक रोल मॉडेल म्हणून विकसित होत असताना पाहून सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.
मतदार संघातील दाजीपूर ते किटवडे पर्यंत प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी हजारो कोटींचा निधी खेचून आणला असून भविष्यात अनेक विकास कामे पूर्ण करावयाची आहेत. पूर्वी डोंगराळ, अविकसित, मागसलेला मतदार संघ म्हणून ओळख असणाऱ्या मतदार संघाला सुजलाम-सुफलाम, एक विकासात्मक व सर्वाधिक प्रगत मतदार संघ बनवलायचे समाधान वाटते.
तसेच लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सत्तर हजार लाभार्थी भगिनींचा कार्यक्रम घेणार असून, राज्यात सर्वाधिक घरकुल कामे आपल्या मतदार संघात आपण केले आहे. आपल्या मतदार संघातील लोकांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरण्याकरिता आपण काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी कोकण केसरी के.जी.नांदेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील, अशोकराव भांदीगरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने, गटविकास अधिकारी डॉ.शेखर जाधव, माजी सभापती किर्तीताई देसाई, सुनिलराव निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंतराव चोरगे, तालुका वैधकीय अधिकारी डॉ.वर्धन, डी.व्ही.कुंभार, सरपंच जयसिंग गुरव, उपसरपंच दिलीप मोहिते, ग्रा.पं. सदस्य मुस्तकीम काझी, शशिकांत फगरे, सूर्याजी घावरे, शुभांगी माने, सुजाता पाटील, अश्विनी सुतार, वर्षा नांदुलकर, तंटामुक्त अध्यक्ष युवराज फगरे, विष्णू मोरे, आश्रू फगरे, बबन फगरे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.