कोल्हापूर, ता.११ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने श्री दुर्गामाता दूध संस्था हालेवाडी ता.आजरा या संस्थेचे दूध उत्पादक, सचिव बाळासाहेब पाटील यांनी शासनाच्या व संघामार्फत दिल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसाय संबंधी योजनांचा गावातील दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणे लाभ मिळवून दिल्याबद्दल, तारदाळ येथील कॅप्टन प्रथमेश धनाजी शिंदे यांनी इंडियन नेव्ही गोवा येथे सेवा बजावत असताना मिसाईलचे ट्रेनीग देत असताना दहा मुलांचे प्राण वाचवले बद्दल, कुमारी राखी रमेश कांबळे रा. नेर्ली हिने महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी अनुसूचित जाती मधील महिला प्रवर्गामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकवलेबद्दल तसेच संघाच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मगरे व डॉ.सुभाष गोरे यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रभावीपणे राबविलेबद्दल व गोकुळचे फोरमन संदिप गणपती भांदीगरे यांनी इंजिनिअरींग विभागामधील उत्कृष्ट कामगिरी करून संघाची बचत केलेबद्दल तसेच उत्कृष्ट दूध उत्पादक प्रकाश जाधव रा. पेंढारवाडी यांचा गोकुळच्या वतीने व त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक यांचे हस्ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला.




