Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeमांगेवाडी जवळ मॅक्स पिकअप व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार...

मांगेवाडी जवळ मॅक्स पिकअप व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार ; सर्वजण सोळांकुर गावचे..

सोळांकुर प्रतिनिधी:सगळीकडे गणेशोत्सवाची धामधुमी सुरू असतानाच सरवडे व मांगेवाडी स्मशानभूमी जवळ मॅक्स पिकअप व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागेवर ठार झाले आहे. मयत सर्वजण सोळांकुर ता.राधानगरी गावचे असून गारगोटी हुन ते सोळंंकुरकडे गावी येत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

मॅक्स गाडी व ट्रकच्या या अपघातात मॅक्स गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. मृतामध्ये आकाश आनंदा परीट, शुभम चंद्रकांत धावरे व रोहन संभाजी लोहार या तरुणांचा समावेश आहे. अन्य 4 जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेने सोळांकुर परिसरात शोककळा पसरली आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News