दोनवडे: खुपिरे तालुका करवीर येथे पर्यावरण पूरक मूर्तिदान उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावचे सरपंच सौ.तृप्ती संजय पाटील यांच्या हस्ते मूर्तिदान उपक्रमास सुरुवात झाली. यावेळी त्यांनी मूर्ती मूर्ती दान व निर्माल्य दान करण्याचे गणेश भक्तांना आवाहन केले.त्यास ग्रामस्थांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत मूर्ती गाव तलावात विसर्जित न करता त्या कुंडात दान केल्या . सुमारे ५०० च्या वर मूर्ती दान करण्यात आल्या.
यावेळी माजी सरपंच संजय दादू पाटील सर, एबी9 मराठी चॅनेलचे चे संपादक दत्तात्रय बोरगे,विशाल नाईक,ग्रामपंचायत कर्मचारी रवी हराळे ,हैदर मुल्लानी ,मोहन भाट ,शहाजी हराळे,कृषी सेवक महादेव पाटील यांनी हा उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली.