सायबर महाविद्यालयात दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त आयोजित चर्चासत्रात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी वरील उद्गार काढले
जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून 2006 पासून प्रत्येक वर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस विविध ठिकाणी प्रबोधन पर पार पाडला जातो सध्याची आत्महेची आकडेवारी व त्यामध्ये आत्महत्या करणाऱ्या युवकांचे प्रमाण हे चिंतनीय बाब असून त्यामुळे सामाजिक विघटन होत असून कुटुंब उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे यासाठी विशेष करून तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन व पर्यायाने संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. सोनिया राजपूत यांनी आत्महत्या मागील मानसिक कारणांचा आढावा घेतला तर प्रा. डॉ. सुरेश आपटे यांनी आत्महत्येची आकडेवारी विशद करून तरुणांनी अपयश पचवण्याची ताकद ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले प्रा. डॉ. दुर्गेश वळवी यांनी ताण-तणाव व्यवस्थापन व व्यसनाधीनते पासून दूर राहिल्यास आत्महत्या टाळता येऊ शकतात असे नमूद केले कार्यशाळेत विद्यार्थी प्रतिनिधी अर्चना बंगे यांनी समाज माध्यमाचा अतिरेकी वापर टाळण्याचे आवाहन केले तर विशाखा वानखेडे यांनी शासन स्तरावर देखील याबाबत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले तर संकेत पिसे यांनी आत्महत्या प्रतिबंधाबाबत जास्तीत जास्त जनजागृती पर कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले कार्यशाळेचे सूत्रसंचालन अर्चना बंगे यांनी केले आभार प्रदर्शन संकेत पिसे यांनी केले कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी कोमल तायडे, विजय चौगुले, पल्लवी अवचार, भावना बंबटकर यांनी परिश्रम घेतले.