Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialपांडुरंग रामजी पाटील यांच्या चौथ्या स्मृतिदिनी ७३ जणांनी केले रक्तदान...

पांडुरंग रामजी पाटील यांच्या चौथ्या स्मृतिदिनी ७३ जणांनी केले रक्तदान…

दोनवडे प्रतिनिधी:  खुपीरे ता.करवीर येथील श्री बलभीम विकास सेवा सोसायटीचे मा. चेअरमन व करवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग रामजी पाटील (तात्या ) यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

स्वर्गीय पांडुरंग पाटील यांनी बलभीम विकास संस्थेच्या माध्यमातून सहकार वाढीस नेला. त्यांनी करवीर पंचायत समितीचे उपसभापती,कुंभी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष,यशवंत सहकारी बँकेचे संचालक आदी संस्थेत पदे भूषविली.

त्यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने 1 दिवसाचे हरिपाठ पारायण,रक्तदान शिबीर तसेच नेत्र रुग्णांची तपासणी घेण्यात आली.त्याचबरोबर गावातील प्रशासकीय सेवेत निवड झालेल्यांना गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 73 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमास युवानेते देवराज नरके, कुंभी कासारी सहकारी कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील,यशवंत बँकेचे माजी चेअरमन एकनाथ पाटील, माजी संचालक एस.के.पाटील,कुंभी बँकेचे माजी संचालक आनंदा कृष्णा पाटील,दत्त सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय तुकाराम पाटील,बजरंग दूध संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील,अर्जुन पाटील, महालक्ष्मी रक्तपेढीचे व्यवस्थापक विनायक शिंदे , ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी व गावकरी उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News