मुंबई: मराठा आरक्षणाचा मोठा फटका मराठवाड्यात बसला. मराठवाड्यातील ९ पैकी केवळ १ जागा महायुतीला मिळाली. त्यात पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. आताही मराठा आरक्षणाची धग कायम असून त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर आहेत. त्यासाठीच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरु झालेल्या आहेत.




