Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALतर..लाडक्या बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तर..लाडक्या बहीण योजनेचे पैसे दुप्पट करू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

धाराशिव : सध्या महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून 1500 रूपये जमा होतात. पण विधानसभा निवडणुकीत जर आम्हाला मोठा जनादेश दिला, तर आम्ही लाडकी बहिण योजनेचे पैसे दुप्पट करून 3000 रूपये करू, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी धाराशीवमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठं विधान केले. जर आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधारी महायुतीला “मोठा जनादेश” दिला तर सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेची मासिक आर्थिक मदत दुप्पट करून 3,000 रुपये करेल, असे विधान शिंदे यांनी केले आहे.

तसेच “विरोधक आमच्यावर टीका करतात, राज्य सरकार नंतर रिकामी तिजोरी दाखवून योजना बंद करेल. ‘एकदा बाण धनुष्यातून सुटला तो सुटला तसा मुख्यमंत्री किंवा तुमच्या भावाने शब्द दिला म्हणजे दिला. या योजना बिलकुल बंद होणार नाही. आम्ही बहिणींना दीड हजारावर थांबवणार नाही तर तुम्हाला लखपती दिदी बनवणार आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News