Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialपन्हाळा नगरपरिषदेचे राज्यस्तरीय चित्रकलेसह विविध स्पर्धेचे आयोजन..

पन्हाळा नगरपरिषदेचे राज्यस्तरीय चित्रकलेसह विविध स्पर्धेचे आयोजन..

पन्हाळा प्रतिनिधी: पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा नामांकन मिळण्यासाठी तसेच किल्ल्यांसह भोवतालच्या परिसराबाबत आत्मीयता वाढावी यासाठी आता लोकसहभाग घेण्याचा निर्णय पन्हाळा  नगरपरिषदेने घेतला आहे. यात ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येणार असून किल्ल्यांसंदर्भात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी स्पर्धा घेऊन या माध्यमातून शाळांना बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ‘युनेस्को’ ने श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ गड-किल्ले हे जागतिक वारसा दर्जासाठी मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पने खाली नामांकित केले आहे. त्यात महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूचा जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.तसेच त्यामध्ये पन्हाळा किल्ल्याचा प्रामुख्याने समावेश आहे. याबाबत ५ ऑक्टोबर दरम्यान ‘युनेस्को’ची समिती पन्हाळगडावर भेट देणार आहे.
या अनुषंगाने राजस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १८ वर्षावरील आहे. दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी, वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ असेल, तर चित्रांसाठी पन्हाळा गडावरील कोणतेही ऐतिहासिक स्थळ निवडावे. स्पर्धा नगरपरिषद कार्यालय या ठिकाणी होईल. यासाठी प्रथम क्र. ४४४४४/- हजार रुपये द्वितीय क्र.३३३३३/- हजार रुपये तृतीय क्र.२२२२२/- हजार रुपये बक्षिसे ,उत्तेजनार्थ दोन ३३३३/- हजार असे बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचे बक्षीस वितरण २ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. पन्हाळा गडाचा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आपली नावे   अमित माने, मो,क्र,९५१८९६८५८२ , मुकुल चव्हाण,मो,क्र,९५०३६४९८७९ ,नंदकुमार कांबळे, मो,क्र,९९२३११२०७१यांच्याकडे नोंदवावी अशी माहिती प्रशासक व मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिली.तसेच त्याकरिता किल्ल्यांशी निगडित भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व विशद करण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत असेही सांगितले. किल्ल्यांविषयी प्रत्येकाच्या मनात आत्मीयता असून या स्पर्धेतून किल्लेसंवर्धनाच्या कार्यात लोकसहभाग मिळून कार्याला चालना मिळावा हाच उद्देश आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News