गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुक्यातील मागासवर्गीय मुलां-मुलींकरीता गारगोटी (फणसवाडी) येथे शासकीय वसतीगृह बांधण्यासाठी प्रत्येकी 17 कोटी या प्रमाणे 34 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतीगृह निर्माण होणार आहे. या कामाचा शुभारंभ उद्या दि.15 रोजी सकाळी 11 वाजता आमदार प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार आहे.




