Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialदर्‍याचे वडगाव येथे "हि रात्र शाहीरांची" कार्यक्रम उत्साहात..

दर्‍याचे वडगाव येथे “हि रात्र शाहीरांची” कार्यक्रम उत्साहात..

दिंडनेर्ली प्रतिनिधी : 
दर्‍याचे वडगाव (ता. करवीर) येथील ओम नमः शिवाय कला, क्रिडा व सांस्कृतिक तरुण मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त हि रात्र शाहीरांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणपती तोडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी शाहीर सुरेश पाटील (दिंडनेर्ली), शाहीर योगेश माने (अलाटवाडी), शाहीर चंद्रकांत मुळीक (दर्‍याचे वडगाव), शाहीर मारुती चव्हाण (अलाटवाडी), शाहीर प्रकाश लोहार (दर्‍याचे वडगाव) आदींनी स्फूर्ती गीते, समाज प्रबोधनपर गीते, ऐतिहासिक पोवाडे सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
या सर्व शाहीरांना भिकाजी मगदूम यांनी (हार्मोनियम), वैभव माने व सुरेश कांडगावकर यांनी (ढोलकी), सदाशिव मुळीक यांनी (तुणतुणे), सर्जेराव पोवार यांनी (टाळ) तर सागर चौगले यांनी (कोरस) साथसंगत केली.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच छाया मुळीक, माजी सरपंच अनिल मुळीक, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ मुळीक, सुनिल तोडकर, गणपती कांबळे, बाबुराव शिंदे, सखाराम मेटील, अशोक बेनके, रघुनाथ जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News