बहिरेश्वर प्रतिनिधी:
करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर येथे नदीकाठी जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या गणपती शंकर परीट यांना बिबट्या दिसला पण त्यांनी घाबरून पळ काढला व गावी येवून ग्रामस्थांना याची कल्पना दिली.कोगे ,बहिरेश्वर ,म्हारूळ यांची शेती असलेल्या क्षेत्रात बिबट्याचे दर्शन झालेने वन विभागाने नागरिकांना सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.