कोल्हापूर: “लोकशाहीचा चौथा स्तंभ” ही जबाबदारी पेलणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्यउल्लेखनीय आहे असे मत माजी आमदार चंद्रदिप नरके यांनी व्यक्त केले ते आज राज्य पत्रकार संघ,कोल्हापूरच्या वतीने जिल्हा कार्यालयात गणेश पूजन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात चौगुले, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान, सचिव सुरेश पाटील जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे, प्रसिद्धी प्रमुख रूपाली चव्हाण,अँड प्रमोद दाभाडे, मदन अहिरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.