Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALराहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस ;वादग्रस्त विधान

राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस ;वादग्रस्त विधान

बुलडाणा प्रतिनिधी : खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळून आला असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अशातच, राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून त्याचे पडसाद राजधानी दिल्लीसह संपूर्ण भारतात उमटण्याची चिन्हे आहे. 

आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

संजय गायकवाड यांचं वादग्रस्त विधान : संपूर्ण भारतामध्ये गोर गरीब गरीब जनता जगू शकत नव्हती. त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता, म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी वगैरे सगळ्यांना आरक्षण दिलं. आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, महायुती संविधान बदलणार आहे, असा आरोप काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आला. त्यामुळे आता आरक्षण संपणार या बोंबा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या आणि ओबीसी समाजाची दिशाभूल केली. आता राहुल गांधी देशातील आरक्षण संपवण्याची गरज आहे, असं सांगत आहेत. त्यामुळए त्यांचा खरा चेहरा आज लोकांच्या समोर आला आहे, अशी जोरदार टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News