Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialकोल्हापूर अनंत चतुर्दशी मिरवणूक; पहिला मान तुकाराम माळी तालीम !

कोल्हापूर अनंत चतुर्दशी मिरवणूक; पहिला मान तुकाराम माळी तालीम !

कोल्हापूर: (प्रतिनिधी) कोल्हापूर मध्ये अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला असुन, शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणूकीचे उद्घाटन खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व आमदार सतेज पाटील याचे प्रमुख उपस्थितीत सुरू झाले आहे.

कोल्हापूरच्या अनंत चतुर्दशी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत पहिला मान या तालीम मंडळाला आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजर, आकर्षक चित्ररथ, प्रबोधनात्मक फलक यासह उत्साहात ही मिरवणूक सुरू झाली आहे.

यावेळी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे विजय देवणे, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, आर.के. पोवार, राजू लाटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित ,धनंजय पठाडे, वसंतराव मुळीक यांच्यासह तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News