घुणकी प्रतिनिधी: हातकणगले तालुक्यातील घुणकी येथे भगतसिंग तरुण मंडळाच्या भेटीसाठी जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनी भेट दिली. याप्रसंगी बोलताना त्यांनी युवकांनी गणेश विसर्जन मिरवणुका पारंपारिक पद्धतीने साऊंड सिस्टिम,लेझर मुक्त कराव्यात असे आवाहन केले.
यावेळी डॉ.सोळंकेयांचा सत्कार मंडळाचे उपाध्यक्ष अभिषेक अरविंद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, युवा उद्योजक मोहन मोहिते, ग्रामपंचायत उपसरपंच केशवजी कुरणे तसेच मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.