कोल्हापूर : भावी पिढी सुधारण्या ऐवजी बिघडवण्याची यंत्रणा कार्यरत झाली आहे. करवीर तालुक्यात गांजा विक्री जोरात सुरू आहे. त्यासाठी एक टोळी कार्यरत झाली आहे. ही टोळी गांजा ओढणाऱ्या युवकांशी संपर्क साधुन त्यांना घरपोच गांजा पुरवठा करीत आहेत.अनेक तरुण या व्यसनाच्या आधिन झाले असून अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.पोलीस यंत्रणेला या टोळी बाबत माहीत नाही कि दुर्लक्ष केली जातआहे अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे. नोकरी नाही, उद्योग व्यवसाय करता येत नाही,वय संपले तरी लग्न होत नाही असे नैराश्याच्या फेऱ्यात सापडलेलै युवक दारू, गांजा ,मटका अशा व्यसनाच्या आधिन झालेले दिसत आहेत. काही दिवसा पासून करवीर तालुक्यात गांजाची विक्री करणारी यंत्रणा सक्रिय झाली आहे. ते तरूण ग्राहक हेरून त्या गावापर्यंत येउन गांजा विक्री करीत आहेत.आता हे युवक या व्यसनाच्या एवढे आहारी गेलेत कि त्याना गांजा ओढल्या शिवाय चैन पडत नाही. या मध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. ही मुले काही ही काम करीत नाहीत. गुन्हेगारीकडे वळले आहेत.
शाळा, महाविद्यालये, मंदिर अशा परिसरात राजरोस गांजा ओढताना हे तरुण दिसत आहे. आंधळयाची भूमिका सोडून पोलिसांनी या गांजा विक्री टोळीचा वेळीच बदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.