कोल्हापूर : विधानसभा निवडणूक जवळ येत असताना करवीर विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे.प्रामुख्याने काँग्रेसचे राहूल पाटील याच्यासाठी आ.सतेज पाटील हे जोरदार कामाला लागलेत तर संताजी घोरपडेंच्यासाठी आ.विनय कोरे सक्रिय झालेत पण माजी आ.चंद्रदीप नरके महायुतीत असुनही त्यांचेसाठी खा.धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीचे नेते फारसे सक्रिय दिसत नाही त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघात आता प्रामुख्याने काँग्रेसचे राहूल पी.पाटील विरोधात महायुतीचे माजी आ.चंद्रदिप नरके यांच्यात प्रामुख्याने लढत होणार हे निश्चित झाले आहे तर संताजी घोरपडे व राजेंद्र सुर्यवंशी हे ही मैदानात आहेत. राहूल पाटील यांच्यासाठी आ.सतेज वोट बँक ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी खा.छत्रपती शाहू महाराज ,चेतन नरके यांनी पाठिंबा देत कार्यकर्ते कामाला लावलेत. तर संताजी घोरपडेंच्यासाठी आ.विनय कोरे यांनी मेळावा घेउन जनसुराज्य पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांची घोषणा केली. या मतदारसंघात आ.सतेज पाटील यांची मोठी ताकद आहे.तशीच पण कमी जास्त प्रमाणात महाडिक गट यांची देखील आहे.महायुतीत असून संभाव्य उमेदवार चंद्रदिप नरकेंच्यासाठी त्यांनी अद्याप स्पष्ट भूमिका व्यक्त केलेली नाही. त्यामुळे त्या गटाचे कार्यकर्ते महाडीकांच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.