Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALराहुल गांधीजींना दिल्या जाणा-या धमक्यांविरोधात काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर..

राहुल गांधीजींना दिल्या जाणा-या धमक्यांविरोधात काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर..

मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा पोहोचवण्याच्या धमक्या देत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधांना पत्र लिहिले आहे पण अद्याप या धमकीबाजांवर कारवाई करण्यात आली नाही. एकनाथ शिंदेचा गावगुंड आमदार संजय गायकवाडने राहुल गांधीची जीभ कापणा-यास बक्षीस जाहीर केले भाजपाचा खा. अनिल बोंडेने त्यांच्या जीभेला चटके देण्याचे वक्तव्य केले आहे. या गंभीर धमक्या असून सरकारने यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी उद्या गुरुवारी काँग्रेस पक्ष राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना सातत्याने धमक्या देणा-या व बेताल वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची अनिल बोंडेची लायकी नाही, तो काही विद्वान नाही, त्याला मंत्रीपद, खासदारकी कशी मिळाली हे आम्हाला माहित आहे, योग्य वेळ आल्यावर तेही जाहीर करू. अनिल बोंडे जी भाषा बोलले त्याच भाषेत काँग्रेसही उत्तर देऊ शकते पण काँग्रेसची ती संस्कृती नाही. दोन महिन्यानंतर भाजपा युतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, त्यावेळी अनिल बोंडे कुठे असेल त्याचा त्यांनी विचार करावा. शिवसेनेचा गावगुंड आमदार संजय गायकवाड, दिल्लीतील भाजपाचा माजी आमदार व नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एक मंत्री यांनी केलेली विधाने अत्यंत निषेधार्ह आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी यावर गप्प बसणे याचा अर्थ त्यांचा याला पाठिंबा आहे असे दिसते.
राहुल गांधी यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली आहे. हे सर्वांना माहित आहे. त्याच इराद्याने आता राहुलजींना धमक्या दिल्या जात आहेत का? असा सवाल उपस्थित करून काँग्रेस कार्यकर्ते खासदार राहुल गांधी यांच्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत असे नाना पटोले म्हणाले. राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपाचे नेते जी भाषा वापरत आहेत, धमक्या देत आहेत त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. या धमकीविरांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्याची मागणी केली आहे पण महाभ्रष्ट युती सरकार कारवाई करत नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या गुरुवारी राज्यभर रस्त्यावर उतरून राहुल गांधींना धमक्या देणा-या भाजपच्या तालिबानी वृत्तीविरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News