Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSportक्रिएटर्स क्रिकेट टूरनामेन्ट च्या किट चे अनावरण..

क्रिएटर्स क्रिकेट टूरनामेन्ट च्या किट चे अनावरण..

दिंडनेर्ली (सागर शिंदे ):क्रिएटर्स फोटोग्राफर फौंडेशन संचलित, कोल्हापूर क्रिएटर्स ग्रुप तर्फे दरवर्षी फोटोग्राफर व त्यांच्याशी निगडित व्यावसायिकांसाठी क्रिकेट स्पर्धा घेतली जाते … क्रिएटर्स क्रिकेट टूरनामेन्ट … या स्पर्धेचे यंदा 2 रे वर्ष असून या स्पर्धेच्या किट चे अनावरण आज दिनांक 19-09-24 रोजी शाहू स्मारक भवन येथे सहभागी टीम च्या उपस्थितीत झाले.
 स्पर्धा 24,25,26 व 27 सप्टेंबर रोजी शास्त्रीनगर क्रिकेट ग्राउंड वर खेळवली जाणार असून, बक्षीस वितरण व स्नेहमेळावा 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 ते 11 महासैनिक दरबार हॉल ला होणार आहे, यासाठी फाईव्ह स्टार इव्हेंट मुख्य प्रायोजक असून, महासैनिक दरबार हॉल व अमर एल इ डी व सम्मेद एल इ डी हे सह प्रायोजक आहेत तसेच DYP ग्रुप ग्राउंड प्रायोजक आहेत, ट्रॉफी भावेश्वरी फोटो यांचेकडून मिळणार असून, इतरही विविध कंपन्या स्टॉल प्रायोजक आहेत या कार्यक्रमास क्रिएटर ग्रुपचे संजय शहापुरे रणजीत गवळी,सोमनाथ करपे, विजय गायकवाड ,रणजीत पाटिल आदी फोटोग्राफर मोठ्या संखेने उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News