Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeSocialडॉ. डी.वाय.पाटील ग्रुप च्या माध्यमातून आमदार  ऋतुराज पाटील यांनी घेतले 72 क्षयरुग्ण...

डॉ. डी.वाय.पाटील ग्रुप च्या माध्यमातून आमदार  ऋतुराज पाटील यांनी घेतले 72 क्षयरुग्ण दत्तक..

कोल्हापूर :आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दीष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी 9 सप्टेंबरला 2022 ला प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समुह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना किमान सहा महिन्यासाठी पोषण आहार किट देऊन प्रदाता म्हणजेच निक्षय मित्र बनून सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी कोल्हापूर डॉ.माधव ठाकूर व करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांच्या मार्गदर्शन नुसार करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. डी.वाय.पाटील ग्रुप च्या माध्यमातून आमदार श्री ऋतुराज पाटील यांनी 72 क्षयरुग्णांना दत्तक घेतले.आज पोषण आहार कीट प्रदान कार्यक्रम पार पडला.

टी.बी च्या उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळूनही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांना पोषण आहार घेणे हे महत्वाचे आहे.यासाठी रुग्णांना भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे फूड बास्केट तयार करण्यात आली आहेत. तो आहार व्यवस्थित घेतल्या मुळे रुग्न लवकर बरा होईल.पूर्ण औषधोपचारामुळे व योग्य पोषण आहार घेतल्याने टी.बी. हा पूर्णपणे बरा होतो. अशी माहिती यावेळी आरोग्य विभाग अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली.
यावेळी जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज पटेल,करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने श्रीम.दिया कोरे, श्री धनंजय परीट, श्री.डी. डी. पाटील श्री. एकनाथ पाटील उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News