अंतरवालीचराटी : मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून, तिसऱ्या दिवशी त्यांची तब्येत काही प्रमाणात खालावली आहे. शरीरातील साखर कमी झाल्याने त्यांना थकवा जाणवत आहे. यातच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केलीय.
मनोज जरांगे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपचार घेण्याची विनंती केली. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितले.
याआधी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मनोज जरांगे यांची आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केली होती. यावेळी जरांगे यांची शुगर डाऊन झाली होती आणि ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजन लेव्हल नॉर्मल असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.