Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALकोल्हापूर जिल्ह्यात भाजपला हव्यात 5 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला हव्यात 5 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 4 जागा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. कोणाला कोणता मतदारसंघ मिळणार या बाबत चर्चेला वेग आला आहे. महायुतीकडे मातब्बर उमेदवार असल्याने उमेदवारीसाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.
प्रमुख नेत्यांनी ही आपल्या पक्षास उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत.भाजप हा मोठा भाउ ठरत आहे .या पक्षाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील व खा.धनंजय महाडीक यांनी पाच जागेची मागणी केली असल्याचे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अर्थात मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार जागेची मागणी केली असल्याची खात्री लायक माहिती आहे. शिवसेना शिंदे गटाचा एक खासदार व आमदार असल्याने त्यांनी ही चार ते पाच जागेची मागणी केली आहे.त्यामुळे उमेदवारीसाठी कमालीची चुरस सुरू झाली आहे.मात्र महायुतीने कांही फॉर्मुला ठरवला असून उमदेवारी देताना विदयमान आमदार यांना प्राधान्य नसेल तर दोन नंबरची मते मिळवलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.त्या नुसार यादी बनवली आहे.पण मतदार संघात उमेदवारांची ताकद व निवडून येण्याची क्षमताही विचारात घेतली जाणार आहे.नावे निश्चित करण्यासाठी पितृ पक्ष पंधरवड्याचा अडथळा ठरत आहे.हा आठवडा संपले नंतर मुलाखती होउन नावे निश्चित करण्यात येणार आहे असे या सुत्राकडून सांगण्यात आले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News