Sunday, December 7, 2025
Google search engine
Homecrimeसांगलीत जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

सांगलीत जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर एका जिमचालकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे . या प्रकरणातील आरोपी संग्राम देशमुखला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याला मदत करणारी महिला आरोपी सुमित्रा लेंगरेवरही  कारवाई व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आज आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला मदत करणाऱ्या महिलेला अटक केली असून सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
आरोपींने मुलीवरील अत्याचार केलेल्या कृत्याचे चित्रीकरण केल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित संग्राम देशमुखला एक महिला मदत करत होती असेही पोलीस तपासात समोर आले आहे. संग्राम देशमुखहा आटपाडी मध्ये जिम चालवत होता. आरोपींकडून आणखी काही मुली आणि महिलांवर अशा पध्दतीने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. अत्याचाराच्या निषेधार्थ आणि हा अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी आज आटपाडी बंदची हाक देण्यात आली.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News