Sunday, December 7, 2025
Google search engine
HomePOLITICALकागलच्या घाटगे- मुश्रीफांच्या तोफा पुण्यात धडाडणार..

कागलच्या घाटगे- मुश्रीफांच्या तोफा पुण्यात धडाडणार..

 कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कागल मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. मंत्री हसन मुश्रीफ विरूद्ध राजे समरजित घाटगे यांच्यातील लढतीच्या निमित्ताने आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. कागल तालुक्यातील या तोफा आता उद्या रविवारी पुण्यात तर त्यानंतर मुंबईत धडाडणार आहेत. कागल विधानसभा मतदार संघाची निवडणूक चुरशीची होणार या बाबत शंका नाही. मतदाराना आपल्याकडे खेचण्यासाठी दोघाकडून संधी सोडली जात नाही. कागलच्या गैबी चौका पासून मतदारसंघातील ते गडहिंग्लजच्या राजकीय मैदाना पर्यंत आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या आरोपाच्या फैरी  आता पुण्यात झाडल्या जाणार आहेत. कागल तालुक्यातील नोकरी व्यवसाया निमित्ताने पुण्यात असलेल्या मतदारांसाठी दोघांच्या कडून मेळाव्याचे आयोजन रविवारी केले आहे.त्यासाठी कार्यकर्ते राबत असून मतदारांचे पुण्यातील पत्ते शोधून त्याना मेळावा स्थळापर्यत घेउन येण्याची सोय केली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगेंचा विजयी संकल्प मेळावा पिंपरी -चिंचवडमध्ये उद्या रविवारी 11 वाजता होणार आहे. खा.सुप्रिया सुळे या उपस्थित राहणार आहेत तेवढ्याच ताकदीचा मेळावा मंत्री हसन मुश्रीफ याचा होणार आहे. कागलच्या घाटगे- मुश्रीफांच्या तोफा पुण्यात धडाडणार आहेत. कागलचे राजकीय युध्द पुण्यात लोकांना पहायला मिळणार आहे

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News