Friday, January 16, 2026
Google search engine
HomeSocialगारगोटी येथे बौध्दविहार उभारणीचा उद्या रविवारी शुभारंभ

गारगोटी येथे बौध्दविहार उभारणीचा उद्या रविवारी शुभारंभ

गारगोटी प्रतिनिधी:  भुदरगड तालुक्यात गारगोटी येथे सर्वसोयीनियुक्त बौद्धविहार (डॉ.आंबेडकर भवन) उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 5 कोटीचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा शुभारंभ रविवार दि.22 रोजी सकाळी 11 वाजता आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.
भुदरगड तालुक्याचे केंद्र असलेल्या गारगोटी येथे भव्य बौद्धविहार व्हावे असे तालुक्यातील जनतेचे अनेक वर्षाचे स्वप्न आहे. यासाठी भरघोस निधीची मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीने सातत्याने केली जात होती. अनेक वर्षाचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन स्तरावर कसोशीने प्रयत्न केले. अनंत अडचणीवर मात करत निधी मिळविण्यात यश आले असून या निधीतून समाजाला अभिमान वाटेल अशी वास्तू उभा होणार आहे. यामध्ये मल्टीपर्पज हॉल, ध्यानधारणा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, निवास व्यवस्था आदी सुविधा करावयाच्या आहेत.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News