Friday, January 16, 2026
Google search engine
Homecrimeतुळशी धरणात सापडला तरुणाचा सांगाडा..

तुळशी धरणात सापडला तरुणाचा सांगाडा..

धामणी – कांबळवाडी ता. राधानगरी येथील कृष्णात शिवाज मांडरेकर वय ४६ हे काही दिवसांपासून घरातुन निघुन गेले होते . आज त्याचा मृतदेह तुळशी धरण  येथील नर्सरी मध्ये कुजलेल्या स्वरूपात आढळून आला .

राधानगरी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळशी धरण नर्सरीमध्ये दिगंबर दत्तात्रय तामकर हे गुरे चारण्यासाठी गेले होते . त्यांना तेथे सांगाडा आढळून आला . त्यांनी तात्काळ राधानगरी पोलीसांशी संपर्क साधुन माहीती दिली .

राधानगरी पोलीसांनी केलेल्या तपासात तो सांगाडा कांबळवाडी येथील बेपत्ता कृष्णात शिवाजी मांडरेकर याचा असल्याची माहिती दिली . नातेवाईकांनी कपडयावरून  सापडलेला सांगाडा कृष्णात मांडरेकर याचा असल्याची खात्री केली आहे .  शव विच्छेदन धामोड प्रा. आ. केंद्राचे वैद्यकिय अधिकारी नरेश सिरसुलवार यांनी केले .

या प्रकरणाचा अधिक तपास राधानगरीचे पोलीस निरीक्षक एस एस गोरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर  हे करत आहेत .

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News