भोगावती :माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली करवीर विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू आहेत. अनेक कार्यकर्ते नरके यांच्या कामावर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. परीते येथील माजी सरपंच सुभाष मारुती पोवार यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी कुंभी-कासारी सहकारी बँकेचे चेअरमन अजित नरके, परिते गावातील प्रतिष्ठित नागरिक मारुती दुर्गप्पा पोवार, अजित पाटील परितेकर, अशोक मारुती पवार, पंकज पोवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.