कोल्हापूर:
कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे. यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघांपैकी आठ विधानसभा मतदारसंघांचा तिढा अखेर सुटला आहे त्यात कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर विधानसभा व हातकणंगले विधानसभा काँग्रेसकडे, राधानगरी ,शाहूवाडी मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे तर कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेलेला आहे.




