धामणी प्रकल्पाचे काम लवकरच पूर्णत्वास : मा. आमदार चंद्रदीप नरके
कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : धामणी प्रकल्प काम सुरु असताना अनेक अडचणी आल्या अनेक वेळा हा प्रकल्प बंद पडला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या सहकार्याने या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले आहे लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे त्यामुळे धामणी खोऱ्याला मुबलक पाणी उपलब्ध होईल असे आश्वासन मा. आमदार व कुंभी कासारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी दिले.
यावेळी माजी आमदार नरके यांच्या उपस्थितीत विलास बोगरे सर यांनी पंचायत समिती सदस्य पीडी पाटील व रवी चौगुले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाकरे (ता. करवीर) येथील अर्चना हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नरके म्हणाले मी मातब्बर लोकांसमवेत दहा वर्षे जनतेने मला निवडून दिले कोरोना काळात अनेकांना मदत केली सत्ता नसताना सुद्धा मला कार्यकर्त्यांनी मानसन्मान दिला बोगरे कुटुंबीयांनी मला चांगली साथ दिली आता ती पुन्हा स्वगृही परतले आहेत त्यांना आपली चूक लक्षात आली असून पुन्हा ते आमच्यातून निघून जाणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात आपसातील भांडणामुळे धामणी प्रकल्प ही लाल किती अडकला आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला आहे आणि तो लवकरच पूर्णत्वास येईल.
कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके म्हणाले, शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने काम करण्यास सज्ज झाले आहेत करवीर मतदार संघाची जेव्हा पुनर्रचना झाली तेव्हा चंद्रदीप नरके यांना भोगावती पट्ट्यातही चांगले यश मिळाले. आता चंद्रदीप नरके यांना पुन्हा आमदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन केले.
विलास बोगरे म्हणाले, माझा हा पक्षप्रवेश नसून कुटुंबातील रुसून गेलेली व्यक्ती रुसवा-फुगवा निघाल्यावर परत स्वगृही आलेली आहे. माझ्या यशाचे श्रेय माझ्या वडिलांनंतर माझ्या भावाला जातेय त्यांच्यामुळेच मी येथपर्यंत पोचलो आहे दुसऱ्या पक्षात असतानाही चंद्रदीप नरके यांच्या मला साथ लाभली रखडलेला धामणी प्रकल्प चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने सुरू झाला आहे आता केवळ पाच टक्केच काम अपूर्ण आहे लवकरच प्रकल्प पूर्णत्वास येईल. नरके यांचे काम वाखाणण्यासारखे आहे आपले कार्यकर्त्यांची सर्व ताकत त्यांच्या मागे लावून त्यांना आमदार करायचा निश्चय करूया आवाहन केले.
यावेळी कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक अनिश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण पाटील, प्रकाश बोगरे, विलास पाटील, दगडू पाटील यांच्यासह बोगरे कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.