Sunday, December 7, 2025
Google search engine
HomePOLITICALसोळांकूरचा टोलनाका नव्हे तर समस्या निर्मूलन केंद्र : ए.वाय.पाटील

सोळांकूरचा टोलनाका नव्हे तर समस्या निर्मूलन केंद्र : ए.वाय.पाटील

सोळांकूर/प्रतिनिधी:  राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा डांगोरा पिटत आहेत मात्र दर्जाहीन सुमार रस्त्यांची कामे, निकृष्ट बांधकामे, बेरोजगारी, औद्योगिकीकरण यासह अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत.दूधगंगा कालव्याचे अस्तरीकरण उखडले तर धरणाच्या गळती साठी तीन चार टेंडर झाली मात्र पसंतीचा काँन्ट्रक्टर मिळाला नसल्याने काम रेंगाळले आहे हा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राधानगरी विधानसभेच्या मैदानात उतरणारच अशी घोषणा ए वाय पाटील यांनी करुन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

राधानगरी तालुक्यातील अर्जूनवाडा येथील स्वप्नपरी सभागृहात आयोजित महाविकास आघाडी प्रणित जिल्ह्याचे नेते ए.वाय.पाटील यांचा कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांचा जनसंपर्क मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अर्जूनवाड्याचे माजी सरपंच विलास शामराव पाटील हे होते.
     ते पुढे म्हणाले गेली ४० वर्षे लोकांच्या समस्या, विकासकामे,रोजगार यासाठी सदैव तत्पर राहिलो. कार्यकर्त्यांना सत्तेचे विकेंद्रीकरण केले.कार्यकर्त्यांची फँक्टरी निर्माण करुन त्यांना नेहमीच उभारी दिली. आपण आमदार झाल्यानंतर राधानगरी विधानसभेतील गावागावात विकासकामांचे शाश्वत रोलमाँडेल तयार करणार. तरुणांना रोजगार,महिला सक्षमीकरण, औद्योगिकीकरण. शेतकऱ्यांना पिक हमी भाव अशा योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवून सर्वांचा कायापालट करणा अशी ग्वाही यावेळी दिली.याप्रसंगी अनेक मान्यवर व पदाधिकार्यांनी मनोगते व्यक्त केली.
      स्वागत नामदेव चौगले यांनी तर प्रास्ताविक नेताजीराव पाटील यांनी केले यावेळी, युवराज वारके, विलास पाटील,रघुनाथ जाधव, शिवाजी पाटील ,नंदूभाऊ पाटील, महादेव कोथळकर,मानसिंग पाटील, आनंदराव पाटील,संदिप पाटील,तानाजी काटकर,बबन जाधव, चंद्रकांत पाटील,धनाजी संकपाळ,  संभाजी देसाई,प्रकाश पोवार, आप्पासाहेब आबदार, वाय डी पाटील,भगवान पातले, विकास पाटील,के.डी.चौगले,गौतम कांबळे, व कार्यकर्ते उपस्थित होते सुत्रसंचालन रामराव इंगळे यांनी तर संभाजी देसाई यांनी आभार मानले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News