बदलापूर: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला केला आहे. त्याला ठाणे क्राइम ब्रँचच्या टीमकडून घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी घेऊन जात असतानाही घटना घाडली. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावरून पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती आहे.