पुणे,प्रतिनिधी :
राजे समरर्जीतसिंह घाटगे एक तत्त्वनिष्ठ व स्वाभिमानी युवा नेते आहेत. अशा नेत्याची आज महाराष्ट्राला गरज आहे.मोडेन पण वाकणार नाही अशा स्वाभिमानी मराठी बाण्याच्या समरजितसिंह घाटगे यांना विधानसभेत पाठवा.असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.
पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने कौटुंबिक संवाद साधताना त्या बोलत होत्या.
खा.सुळे पुढे म्हणाल्या, आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत छत्रपती शाहू महाराजांचा विचार आणि वारसा पुढे नेणे काळाची गरज आहे.समरजितसिंहराजे सातत्याने हेच काम करीत आहेत. नव्या पिढीसाठी नवी स्वप्ने पाहणारे ते नेतृत्व आहे. कागलच्या जनतेने स्वाभिमानी नेतृत्वाला साथ द्यावी.आम्ही त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहू.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे,सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर यांनी या मतदारसंघाचा एक कुटुंब म्हणून विकास केला.त्यांचाच वारसा पुढे चालवताना युवकांचे भविष्य नजरेसमोर ठेवून पुण्यासारख्या संधी कागलमध्ये निर्माण करण्याचे माझे ध्येय आहे. कागल मधील पारंपारिक राजकारण बदलून शाहूंचे कागद कागल असे नवीन ओळख करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मला एक संधी द्यावी,जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेऊन परिवर्तन करावे.
यावेळी जगदीश परीट,माणिक पाटील,ओम एकोंडे, रणजीत कुराडे,वैभव लोकरे,धैर्यशिल इंगळे, तुषार कामटे,सचिन भोसले,संदीप चव्हाण,सुलक्षणा शीलवंत, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास डाॕ.स्वप्निल भोसले,शिवानंद माळी,शहराध्यक्ष तुषार कामठे,शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे,युवा सेना शहराध्यक्ष चेतन पवार, ,राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष विशाल काळभोर,महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य संदीप चव्हाण,राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल भोसले,इम्रान शेख आदींसह ,राजेंद्र मोहिते, वैभव चौगुले , प्रशांत पाटील ,रवी जाधव, प्रवीण भोसले, अनिल कत्रे, उमेश माने, शेखर चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र मोहिते यांनी स्वागत केले.रणजीत वाडकर यांनी आभार मानले.