कोल्हापूर : बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या मताचे आम्ही सर्वजण आहोत. मात्र ज्या पद्धतीन एन्काऊंटरची घटना घडली आहे.. त्यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. आमदार सतेज पाटील यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. यामध्ये कोणतेही दुमत नाही. आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत. मात्र मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळे बोलत आहेत. हे संयुक्तिक नाही. आपटे ना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का याची शंका निर्माण होत आहे. शिवाय या प्रकरणी सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. त्यांनी देखील आक्षेप घेतला आहे. आरोपीला चौकशीसाठी का आणण्यात आले होते? असे अनेक प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना केले.ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले होते. त्यावेळी ते, पत्रकारांशी बोलत होते. चार्जशीट फाईल झाली होती, मग पुन्हा तपासासाठी का आणण्यात आले? तपासाला आणायची वेळ संध्याकाळची का निवडण्यात आली होती? असे अनेक प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले.
दरम्यान, आरोपीने पोलिसांच्यावर गोळीबार करणे हे गृह खात्याची नामुष्की आहे. पण एन्काऊंटर झाले की लगेच काही वेळात डिजिटल बॅनर लागतात. वेगळ्या पद्धतीचे वातावरण होते. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांवरून गृह खात्याची इमेज कशी होत आहे. हे सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचा टोलाही आम.सतेज पाटील यांनी लगावला.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर घटनेची चौकशी हा विषय नाही. मात्र हा विषय वेगळीकडे जात आहे. नेमकी घटना काय घडली. हे समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे घटनेबाबत पोलीस महासंचालकांनी भूमिका स्पष्ट करावी. असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी ही होत आहे. त्यावर बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले खर तर फडणवीस यांनी बदलापूर घटना, अंतरवाली सराटी घटना झाल्यावरच राजीनामा देणे अपेक्षित होते.असेही त्यांनी सांगितले.




