Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALकोल्हापूरच्या जागा वाटपाबाबत आठवड्यात निर्णय..

कोल्हापूरच्या जागा वाटपाबाबत आठवड्यात निर्णय..

कोल्हापूर: कोल्हापुरातील दहा जागांवर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद होणार नाही. काँग्रेस, त्याचबरोबर शरद पवार गट, ठाकरे गट, आम्हीं सर्वजण जागा मागत आहेत. मात्र समोपचाराने चर्चा करून जागांचे वाटप होईल आणि एकोपा दिसेल. १५० हुन अधिक जागा वाटप झालेले आहेत. आणखी काही आहेत ते तीस आणि एक तारखेला स्पष्ट होईल आणि १० तारखेपर्यंत सर्व निर्णय होतील.अशी माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना कोल्हापूरात सांगितले.
आम्ही तिन्हीही पक्ष महाविकास आघाडीचे सरकार राज्याला देण्यासाठी वचनबद्ध आहोत. असेही त्यांनी सांगितले.
राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे. राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे. भाजप एक संघ ठेवू शकत नाही हे दिल्लीच्या नेतृत्वाला कळालेले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना महाराष्ट्राचे वारंवार दौरे करावे लागत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News