कोल्हापूर : गेल्या पस्तीस वर्षात बारामतीत अजित दादांच्या पोस्टरवर काळे फडके लावण्यात आलेले नाही ते आता का घडते? अशी टीका काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना केली.
राज्यातल्या विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याबाबत राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे. यावर आता भाजपचे लोक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेवर, टीका करत आहेत. बारामती मध्ये गेल्या 35 वर्षात कधीही अजित दादांच्या पोस्टरवर काळे फडके लावण्यात आले नाही. ते आता घडत आहे. तुम्ही टीका करायची आणि आम्ही त्या ठिकाणी उत्तर देऊन बाहेर पडायचे असे भाजपचा प्लॅन सुरू आहे. मात्र, महायुती म्हणुन ते सर्वजण एकत्र लढू देत किंवा स्वतंत्र महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना घरी बसवायचा निर्णय घेतला आहे. अशी टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली.