कोल्हापूर : आमची घरे आमच्या मालकीची करून मिळावीत अशा मागणीचे निवेदन करवीर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चंद्रदिप नरके यांना बालिंगे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रंगराव वाडकर, युवा सेना अध्यक्ष अजय वाडकर उपस्थित होते.
बालिंगे (ता. करवीर) गावची मोजणी भूमि अभिलेख कडून सन २०१७ साली करण्यात आली. त्यावेळी बालिंगे गावचे मूळ गावठाणाची मोजणी करण्यात आली. यामध्ये ९९ टक्के गावच्या मिळकत धारकांचे मिळकतीना त्यांचे मालक सदरी नाव दाखल केलं. मात्र कात्यायनी वसाहत मधील ४० ते ५० वर्षे मूळ गावठाण क्षेत्रात घरे बांधून रहिवास करीत आहेत. असं असताना मात्र या वसाहती मधील जवळपास ६० ते ७० मिळकत धारकांना त्यांच्या मिळकतीस मालक सदरी महाराष्ट्र शासन असे नाव लावण्यात आले आहे. भोगवटा सदरी lत्यांचे नावाची नोंद केली आहे. या नोंदी दुरुस्त करून मालक सदरी नाव दाखल करून प्रॉपर्टी कार्ड मिळावे. या आशयाचे निवेदन माजी आमदार चंद्रदिप नरके यांना देण्यात आले.
या निवेदनावर कात्यायनी वसाहत मधील रहिवाशी नंदकुमार गाडे, राजाराम कोरवी, आण्णासो शिंदे, चंद्रकांत कांबळे, शहाजी कांबळे, गंगाराम कुराडे, नाना कोरवी, शामराव कांबळे, युवराज बागडी, प्रथमेश वाडकर,गोविंद कांबळे, रामचंद्र लोणारी यांच्या सह्या आहेत.