कोल्हापूर : (श्रीकांत पाटील) राहुल पाटील यांचे त्यांचे कार्य उल्लेखनीय असून दिवंगत माजी आमदार पी एन पाटील त्यांचा आदर्श घेऊन राजकीय क्षेत्रात ते निश्चितच ठसा उमटवतील. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख जसे पी एन पाटील यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले तसेच मी व अमित देशमुख राहुल पाटील व राजेश पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहू अशी ग्वाही आमदार धीरज देशमुख यांनी दिली. वाकरे तालुका करवीर येथील विठाई चंद्राई सभागृहात आयोजित भव्य युवक मेळाव्यात आमदार देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राहुल पाटील, राजेश पाटील, तेजस्विनी पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी युवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
आमदार धीरज देशमुख म्हणाले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व पी एन पाटील यांची दोस्ती कायम राहिली पी एन साहेब यांचा शब्द विलासराव देशमुख यांनी खाली पडू दिला नाही तशीच खंबीर साथ आम्ही राहुल पाटील यांना देऊ. राहुल पाटील यांच्या कडे फार मोठा अनुभव आहे त्यांचे शिक्षण परदेशात जरी झाले असले तरी त्यांची नाळ ग्रामीण भागाशी जोडली आहे करवीर चा विकास केल्याशिवाय ते गप्प बसणार नाही युवकांनी कोणतीही अडचण असेल राहुल पाटील यांच्या भेट घेऊन त्याला प्रश्न मांडावेत ते नक्की सोडवतील पी एन पाटील आपल्यातून गेले नसून पी एन पाटील यांच्या रूपाने राहुल पाटील हे नेतृत्व दिले आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेवर निवडून आणि असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले
यावेळी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले मी मी लहानपणापासून पी एन साहेबांची कार्यपद्धती पाहिली कोरोना महापूर काळात त्यांनी काय केलेले कार्य उल्लेखनीय आहे साहेबांच्या पद्धतीने आपण कार्यरत राहू करवीरच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांनी मला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले यावेळी तेजस्विनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक रतन भोगम यांनी केले.