कुंभी कासारी साखर कारखान्याचे एक्सपान्शन करण्यासाठी वार्षिक सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. आता कारखान्याची गाळप क्षमता एक हजार टन वाढवण्यात येणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सभा चार तास चालली.
वेळ चर्चेत भाग घेताना गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे म्हणाले, मागील सभेत एक्सपान्शन करण्याबाबत कोणताही सर्वानुमते ठराव झालेला नव्हता तरीसुद्धा ठराव झाल्याचे म्हटले असल्याचे चुकीचे आहे. बहुमताने ठराव मंजूर झाला असे म्हणता येईल. एक्सपान्शन करण्याला आमचा विरोध नाही पण तुमची जबाबदारी घेऊन निर्णय घ्या असे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष नरके म्हणाले, सभेत चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे असे सांगितले. यावेळी सभासदांनीही एक्सपान्शन करण्याची मागणी केली त्यानंतर अध्यक्ष नरके यांनी या विषयाला मंजुरी देत एक हजार टन गाळप क्षमता वाढवण्याची मंजुरी दिली.
यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी आठ हजार टन गाळप क्षमता वाढवण्याची विनंती केली यावेळी अध्यक्ष नरके यांनी एक हजार टन गाळप क्षमता वाढवण्यात येईल असे सांगितले त्यानंतर टप्प्याटप्प्याने गाळप क्षमता वाढवण्यात येईल असे सांगितले. यावेळी प्रकाश देसाई कर्जाचा बोजा का वाढतोय अशी विचारणा करत ऊस दराबाबत प्राधान्य ठेवावे अशी मागणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाजीराव देवाळकर यांनी ऊस दर जाहीर करण्याची मागणी केली यावेळी अध्यक्ष नरके यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री पालकमंत्री, जिल्हाधिकारी व इतर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला जातो असे सांगितले.
यावेळी कुडित्रेच्या सरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी कारखान्याचे ऊस पाळीपत्रक व्यवस्थित व सुरळीत करावी अशी मागणी केली तसेच कारखान्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ग्रामपंचायत तर्फे मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत अमर पाटील, टी एल पाटील, मुकुंद पाटील व सभासदांनी चर्चेत भाग घेतला. आभार उपाध्यक्ष राहुल खाडे यांनी मानले.